रघुकुल सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित

टी . एन . अे / (टी . एन .अे.) एच . एस . जी /(टी . सी.)/६६९७/९४-९५ गट नं . ५३(पैं ),
पारसिक नगर, खारेगाव, कळवा, ठाणे – ४००६०५

संस्थे बद्दल माहिती

कळव्यातील पारसिकनगर भाग झपाट्याने बदलत आहे. मोठमोठी गृह संकुले नव्याने विकसित होत आहेत. अस असतानाही रघुकुल सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादितमर्यादितमर्यादित हि पारसिकनगर भागातील जुन्या पैकी एक असणारी संस्था आपले वेगळेपण आजही टिकवून आहे.

रघुकुल गृह संकुल जवळजवळ १३ हजार चौ.मी. एवढ्या विस्तीर्ण जागेवर वसलेले असून या संकुलाचा आवाका खूप मोठा आहे. या संकुला अंतर्गत एकूण १४ इमारती व २८१ सदनिका आहेत. एकोपा, आपलेपणा आणि जिव्हाळा हाच या संकुलाचा पाया आहे. एक मेकांना सुख दुःख्खात मनापासून साथ देणारे सदस्य हे या परिवाराचे आणखी एक वैशिष्ठय आहे. एक मेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे सहकाराचे ब्रीदवाक्य इथे खऱ्या अर्थाने आचरणात आणलेले दिसून येते. या संकुलातील अनेक कुटुंबे अगदी इमारतींच्या स्थापने पासून आजही इथे एकोप्याने आणि आनंदाने राहत आहेत.

रघुकुल सहकारी गृह निर्माण संस्था नोंदणी क्रमांक

टी . एन . अे / (टी . एन .अे.) एच . एस . जी /(टी . सी.)/६६९७/९४-९५ गट नं . ५३(पैं ), पारसिक नगर, खारेगाव, कळवा, ठाणे – ४००६०५

संस्थेच्या जागेचे क्षेत्रफळ - १३६५९.८२ चौ.मी.

Scroll to Top